नाशिकरोडला मालवाहतूक ट्रकच्या धडकेत अज्ञात तरुणीचा मृत्यु
नाशिकरोडला मालवाहतूक ट्रकच्या धडकेत अज्ञात तरुणीचा मृत्यु
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी):- येथील बिटको चौक, पवन हॉटेल समोर रस्ता ओलांडताना तरुणीला मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिल्याने तरुणी जागीच ठार झाली. चेहऱ्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटू शकली नाही.

नाशिकरोड येथील बिटको चौकात असलेल्या हॉटेल पवन च्या समोर एक महिला काल रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास उड्डाणपूल भाजी बाजार येथून रस्ता ओलांडत असताना तिला नाशिक कडून सिन्नर कडे जाणाऱ्या एन आय 01 ए सी 1051 या क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामध्ये तरुणीच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने व शरीराला जबर मार लागल्याने ती जागीच ठार झाली.

यावेळी तरुणीच्या चेहऱ्याला मार लागल्या असल्याने ओळख पटू शकले नाही. पोलिसांनी संबंधित ट्रक ताब्यात घेतला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पवन हॉटेल समोर नाशिक वरून पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक बस थांबत असल्याने वाहतूकीची मोठी कोंडी होते. जेलरोड तसेच दत्त मंदिर सिग्नल वरून रेल्वे स्थानक कडे जाणारे वाहने मोठ्या प्रमाणत असल्याने मोठी गर्दी आणि कोंडी या ठिकाणी पाहवयास मिळते.भाजीपाला घेऊन अनेक महिला, पुरुष घराकडे जाताना मोठी कसरत त्याना करावी लागते. अपघाताचा तपास पोलीस करीत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group