बाईक-ट्रकमध्ये भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
बाईक-ट्रकमध्ये भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
img
Dipali Ghadwaje
मुंबईतून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे.ट्रिपल सीट बाईक चालवणं किती धोक्याचं ठरु शकतं याचंच एक उदाहरण मुंबईतील परळ येथे बघायला मिळालं. येथे एका बाईकवर ट्रिपल सीट जात असलेल्या तिघांचा भीषण अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.  परळ पुलावर हा भीषण अपघात झाला.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  या अपघातात दोन तरुणींसह एकाचा मृत्यू झाला आहे. तनिष पतंगे (वय २४), रेणुका ताम्रकर ( वय २५) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. बाईक आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. परळ ब्रिजवर हा भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला जोरदार आदळली. बाईकवरुन ट्रिपल सीट जाणाऱ्यांना तिघांचाही यात मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परेल ब्रिजवर दामोदर हॉल समोर सकाळी 6.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बाईकवरुन दोन तरुणी आणि एक तरुण प्रवास करत होते. साउथ बॉण्डने प्रवास करत असताना डिव्हायडरला धडक बसून नॉर्थ बॉण्डने जाणाऱ्या डंपरवर बाईत धडकली.

दोन वाहनांची धडक इतकी जोरदार होती की बाईकच्या समोर भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर ट्रकच्या समोरील भागाचं देखील नुकसान झालं आहे. धडकेनंतर बाईकवरील तिघांना रस्त्यावर पडून डोक्यास गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर जखमींना KEM हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं. डंपर चालकाने स्वत:पोलीस स्टेशनला जाऊन अपघाताची सविस्तर माहिती दिली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group