नाशिक ; जिल्ह्यातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दिंडोरी तालुक्यातील नळवाड पाडा गावात घराचा स्लॅब कोसळून आजोबासह तीन वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गुलाब वामन खरे (वय ६० वर्ष), निशांत खरे (वय ३ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर या घटनेत विठाबाई वामन खरे (वय ८० वर्ष) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान घटनेची माहीती मिळताच नऴवाड पाडाचे सरपंच हिरामण गवळी यांनी आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह व काही ग्रामस्थांनी धाव घेतली.दिंडोरी तालुक्यातील नळवाड पाडा गावात गुलाब वामन खरे हे आपल्या कुटुंबासह राहतात. गुरुवारी रात्री ते घरात झोपले असताना साडेअकरा वाजेच्या सुमारास घराच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. या घटनेत गुलाब खरे आणि त्यांचा नातू निशांत खरे यांना गंभीर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. तर विठाबाई खरे ह्या गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. स्लॅबचा मोठा भाग पडलेला असल्यामुळे तातडीने जेसीबीच्या सहायाने ढिगारा हटवण्यास सुरुवात करण्यात आली.
दरम्यान वृद्द महिलेचा घराच्या एका बाजूकडून ओरडण्याचा आवाज येत असल्याने जेसीबी चालक, सरपंच हिरामण गावीत, ग्रामपंचायत शिपाई यांनी पाहाणी केली. प्रसंगावधान राखून आवाजाच्या दिशेने हाताने स्लॅबचा मलबा हटवित विठाबाई खरे यांना सुखरुप बाहेर काढले.
घडलेली घटना कळताच तहसिलदार पंकज पवार, नायब तहसिलदार तांबे यांच्यासह मंडळाधिकारी आणि ग्रामसेविका ललीता खांडवी मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी हजर झाले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.