नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करणार्या इसमाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी याने फिर्यादी पीडित महिलेला सन 2020 ते 26 जुलै 2024 या कालावधीत वेळोवेळी मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल रॉयल इन येथे बोलावले. त्या ठिकाणी महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ काढला, तसेच हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी भेटायला बोलावून पीडितेला मारहाण केली, तसेच जबरदस्तीने अत्याचार केले. वारंवार होणार्या या छळाला कंटाळून अखेर पीडितेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात इसमाविरुद्ध फिर्याद दिली असून, या प्रकरणी त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येऊन तो अंबड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.