नाशिक (प्रतिनिधी) :- क्षुल्लक कारणावरून एका युवकाला दोघांनी मिळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गांधीनगर परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी सागर राम सदावर्ते (वय 27, रा. राहुलनगर, गांधीनगर, नाशिक) हा युवक व आरोपी गौरव सारोटे, तसेच सौरव सारोटे हे तिघे मित्र आहेत. परवा रात्री जेवण झाल्यानंतर सारोटे बंधू आणि सागर यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाले होते. त्यावेळी सारोटे बंधूंनी त्याला शिवीगाळ व दमदाटी केली.
वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दोघांनी सागरला धारदार शस्त्राने त्याच्या हातावर व डोक्यावर वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सागरला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. गुन्हा घडल्यापासून सारोटे बंधू फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सागर सदावर्ते याच्या फिर्यादीवरून गौरव व सौरव सारोटे यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.