'कोरोना व्हॅक्सिनमुळे मला हृदयविकाराचा त्रास'; 'या' नेत्याचा सरकारवर गंभीर आरोप
'कोरोना व्हॅक्सिनमुळे मला हृदयविकाराचा त्रास'; 'या' नेत्याचा सरकारवर गंभीर आरोप
img
दैनिक भ्रमर
आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकताच खळबळजनक  दावा केला आहे. कोविड व्हॅक्सिन घेतल्यामुळे ज्यांना काही दुखणे नव्हते अशांना देखील हृदयविकाराचा त्रास सुरु झाला. सरकारने व्हॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे त्यांनी लोकाना जबरदस्ती केली, असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना आ. शिंदेनी भेट देत लोकांशी संवाद साधला. याचं दरम्यान इलेकट्रोल बॉण्डच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदीवर टीका करताना आ. शिंदेनी सीरम व्हॅक्सीन संदर्भात धक्कादायक विधान केलं.

"सर्वोच्च न्यायालयाने काल स्टेट बँकेवरती ताशेरे ओढले, इलेक्टरोल बॉण्डचा खुलासा करायला सांगितलं. यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले, त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आले. आपल्याला ज्या सीरम कंपनीची कोरोना वॅक्सिन जबरदस्तीने दिली," असेही शिंदे म्हणाल्या.

अबब! 'या' शहरात दामदुप्पटच्या आमिषाने तब्ब्ल 300 कोटींचा गंडा

"आपल्याला ज्या कंपनीचे जबरदस्तीने व्हॅक्सिन दिले त्या कंपनीने देखील 100 कोटी रुपये दिले आहेत. आपल्याला मारण्यासाठी,  टेन्शन नका घेऊ पण आपल्याला व्हॅक्सिन जबरदस्ती का केलं, कारण सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं. तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं. तुम्हाला त्या व्हॅक्सिनसाठी जबरदस्ती केली," असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

"तुम्हाला त्या व्हॅक्सिनसाठी जबरदस्ती केली आणि त्यामुळे आज कोणाला काही ना काही दुखणे सुरू झाले आहे. ज्यांना काहीच नव्हतं अशांना देखील काही ना काही रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार चालू झाले. मी तर व्हॅक्सिन घेतलंचं नाही. मी खरेच व्हॅक्सिन घेतले नाही, मोदींचे फोटो असताना मी कशासाठी घेऊ? आपला एकमेव देश आहे जिथे व्हॅक्सिन सर्टिफिकेटवर मोदींचे फोटो होते, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group