टोईंग केलेले वाहन सोडवण्यासाठी वाहनधारकाने लढवली अनोखी शक्कल
टोईंग केलेले वाहन सोडवण्यासाठी वाहनधारकाने लढवली अनोखी शक्कल
img
दैनिक भ्रमर

रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून अनेक वेळा कारवाई केली जाते. परंतु कल्याणच्या खडकपाडा परिसरात कल्याण वाहतूक पोलिसांना वेगळाच अनुभव आला. वाहन धारकाने त्याची दुचाकी टो केल्याने संताप व्यक्त केला. त्याने भर रस्त्यात गाडी खाली झोपून गोंधळ घातला. अखेर पोलिसांनाच माघार घ्यावी लागली. त्याची दुचाकी सोडून द्यावी लागली. या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

कल्याणच्या खडकपाडा परिसरात नो पार्किंगमध्ये दुचाकी वाहन उभे होते. वाहतूक पोलिसांनी नेहमीप्रमाणे कारवाई सुरु केली. त्या वाहन चालकाची गाडी टोईंग केली. पोलिसांनी आपली गाडी टोईंग केल्यामुळे वाहन चालक संतप्त झाला. पोलिसांकडून गाडी सोडवण्यासाठी संतप्त चालकाने अनोखी शक्कल लढवली. तो चक्क पोलिसांच्या गाडी खालीच झोपला. तब्बल अर्धा तास तो गाडी खाली झोपून होता.

आपली गाडी रोलिंग व्हॅनवरनं खाली उतरणार नसेल तर माझ्या अंगावरून ही गाडी घेऊन जा, असे सांगत चालकाने विरोध केला. वाहन चालकाचा भर रस्त्यावर हा गोंधळ सुरु होताच नागरिकांनी चांगली गर्दी निर्माण झाली होती. त्याचवेळी वाहतूक पोलिसांना गाडी पुढे काढता येत नव्हती. वाहन चालक ऐकवण्याच्या मनस्थिती नव्हता. यामुळे अखेर वाहतूक पोलिसांनी त्याची टोईंग केलेली गाडी सोडून दिली. हा सगळा प्रकार एकाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. त्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group