ढकांबे गावाजवळ भीषण अपघातात पाच ठार
ढकांबे गावाजवळ भीषण अपघातात पाच ठार
img
DB
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :  दिंडोरी रोडवर ढकांबे गावाजवळ आज दुपारी बोलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाल्याचे समजते.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, की वणी येथे दर्शन घेऊन बोलेरो गाडीतून काही जण नाशिककडे येत होते. बोलेरो भरधाव वेगात असल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. तेव्हाच गाडीचे टायर फुटल्याने गाडी दुचाकीवर जाऊन आदळली.

जखमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तसेच, घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group