नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टी (दक्षिण) ची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी नुकतीच जाहीर केली.या कार्यकरणी मध्ये त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या सोळा वर्षांपासून ते भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे. त्र्यंबकेश्वर युवा मोर्चा शाखाध्यक्ष, युवा मोर्चा शहराध्यक्ष, भाजपा शहराध्यक्ष विविध जबाबदाऱ्या त्यांनी संभाळल्या आहेत. कोविड काळात पक्षाच्या माध्यमातून केलेले मदत कार्य, पक्षाचे कार्यक्रम आंदोलन व उपक्रम या सर्वांच्या जोरावर पक्ष नेतृत्वाने माझ्या कामाची दखल घेतली व जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.
आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण शेवटचा घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम पूर्ण ताकतीने करणार असल्याचे यावेळी सुयोग वाडेकर यांनी सांगितले. दरम्यान विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनिलजी बच्छाव सर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा कार्यकारिणी मध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नियुक्त झालेले पदाधिकारी पुढील प्रमाणे,
जिल्हा उपाध्यक्ष -
सुनिल अडसरे,सुयोग वाडेकर
तालुकाध्यक्ष -
विष्णू दोबाडे
प्रज्ञावंत आघाडी जिल्हा संयोजक -
एडव्होकेट श्रीकांत गायधनी
ओ.बी.सी. जिल्हाध्यक्ष -
कैलास भाऊ पाटील
महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस-
सौ.माधुरी वैभव जोशी
युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस -
सागर जगन उजे
तीर्थ विकास आघाडी जिल्हा संयोजक -
बाळासाहेब चांदवडकर
बेटी बचाओ ,बेटी पढाओ जिल्हा संयोजक -
सुनीताभाभी भूतडा
जिल्हा करकारिणी सदस्य -
प्रशांत तुंगार सुचिताताई शिखरे, तृप्तीताई धारणे, दत्तात्रय जोशी,सुरेंद्र शुक्ल,कमलेश जोशी, मोहन कालेकर,सोमनाथ दिवे
विशेष निमंत्रित जिल्हा सदस्य -
लक्ष्मीकांत थेटे, गिरिष जोशी, संजय शिखरे, बाळासाहेब दीक्षित, संदीप जाधव, प्रभावती तुंगार, पुष्पाताई झोले, शंकर चांदवडकर, डॉ. दिलीप जोशी, देवयानीताई निखाडे, गोविंदराव मुळे, विजय शिखरे, मिलिंद धारणे, अनंत थेटे