आनंदाची बातमी! मान्सूनच्या आगमनाची तारीख आली समोर.....
आनंदाची बातमी! मान्सूनच्या आगमनाची तारीख आली समोर.....
img
Dipali Ghadwaje
देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनविषयी महत्त्वाची अपडेट दिलीय. यावर्षी देशभरात वरुण राजा धो-धो कोसळेल, असा होण्याचा अंदाज हवामन विभागाने वर्तवलाय. 

यावर्षी ८ जूनपर्यंत मान्सून येणार असून जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाळा असणार असल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी दिलीय. सध्याची परिस्थिती मान्सूनसाठी आशादायी असून सध्याची परिस्थिती मान्सूनच्यादृष्टीने चांगली आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्यादृष्टीने समुद्रातील परिस्थिती आशादायी असेल. 

यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा यांनी वर्तवलीय. यंदा जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा राहणार असून या काळात ८७ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण भारतात ५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत १०४-१०६ टक्के वरुण राजा बरसणार आहे.


सध्या अल निनोची परिस्थिती सध्या moderate आहे. हा प्रभाव कमी होत आहे. पावसाळा सुरू झाल्यावर अल निनोचा प्रभाव संपेल, अशी माहिती एम मोहपात्रा यांनी दिलीय. भारतीय हवामान विभागाचा पहिला दिर्घकालीन अंदाज आहे. पुढचा सुधारीत पावसाचा अंदाज मे महिन्यात वर्तवला जाणार आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांसाठी नाही तर सामान्य जनतेसाठी देखील ही खूपच आनंदाची बातमी आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group