ठाकरे गटाच्या आमदाराला प्रचारसभेत चक्कर, स्टेजवरच कोसळले
ठाकरे गटाच्या आमदाराला प्रचारसभेत चक्कर, स्टेजवरच कोसळले
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रात सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरु आहे. कडक उन्हामुळे अनेकांना उष्मघाताचा त्रास होतोय. अनेकांना भर उन्हात काम करावं लागतंय. विशेष म्हणजे राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या सभा, बैठका आणि रॅलींचा धडाका सुरू झाला आहे. अशामध्ये उष्णतेच्या लाटेचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसू लागला आहे. धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना चक्कर आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार रॅलीदरम्यान त्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. घटनास्थळी असलेल्या उपस्थित कार्यकर्त्यांनी कैलास पाटील यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
 

नेमकं काय घडलं ?

मंगळवारी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सहभागी झालेले धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास होऊन ते चक्कर येऊ खाली पडले त्यामुळे रॅलीदरम्यान एकच गोंधळ उडाला.

ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ कैलास पाटील यांना कारमध्ये बसवून नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये नेले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group