जय बाबाजी भक्त परिवारसह शक्तीप्रदर्शनाने स्वामी शांतिगिरी महाराज यांचा लोकसभेसाठी अर्ज दाखल...
जय बाबाजी भक्त परिवारसह शक्तीप्रदर्शनाने स्वामी शांतिगिरी महाराज यांचा लोकसभेसाठी अर्ज दाखल...
img
Mukund Baviskar
नाशिक ( भ्रमर प्रतिनिधी ) : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. आज सोमवार दि. २८ एप्रिल रोजी शहरात राजकीय पक्षांसह अन्य अपक्ष उमेदवारांनी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले यात निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी मोठे शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या जय बाबाजी भक्त परिवाराने 'लढा राष्ट्र हिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा' अशा विचारातून विविध माध्यमातून घरोघरी जाऊन नाशिककरांच्या शांतीगिरी महाराजांचे देशभक्तीचे विचार पोहचवले असून 'अब की बार दस लाख पार' अशा ध्येयाने प्रेरित होऊन सर्वाधिक मतदारांपर्यंत पोहचले आणि यापुढेही अधिक गतीने प्रचार सुरू राहणार आहे.

विशेष म्हणजे भक्त परिवाराच्या वतीने काल शहरातील गोदावरी तीरावरील गौरी पटांगण येथून जोरदार शक्तिप्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मौनव्रतात भव्य रॅली काढण्यात आली. रविवार कारंजा एमजी रोड मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. हजारो नागरिकांची उपस्थिती असतांनाही प्रचंड शांततेत ही रॅली संपन्न झाली. रॅली शिस्तबद्धरित्या काढण्यात आली. 

शांतिगिरी महाराज यांच्या समवेत स्वामी सेवागिरी महाराज, स्वामी लक्ष्मण गिरी महाराज, स्वामी परमेश्वर गिरी, ऋग्वेद नंदजी महाराज,  जनेश्वर महाराज, स्वामी दिव्यानंद महाराज आदी उपस्थित होते तसेच ज्ञानेश्वर गामणे, निवृत्ती कांडेकर ,रवींद्र भोई, संजय भास्करे, बाळासाहेब गामणे, राजेंद्र इंगोले, गणेश पगार, नंदू शेठ पवार आदींसह जय बाबाजी भक्त परिवाराचे जिल्हाभरातील हजारो अनुयायी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
रॅली दरम्यान स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज,महारुद्र हनुमान,चांदीचा गणपती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. रामकुंडावर विधिवत गगापुजन करून भगवान कपालेश्वर महादेवांना नतमस्तक होऊन रॅलीस प्रारंभ करण्यात आला. 

या रॅलीमध्ये महिला भाविकांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला. पिवळ्या साड्या परिधान करून त्या यात सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे संबळ वादक, सजवलेली बैलगाडी या रॅलीचे आकर्षण ठरले. हाती भगवे ध्वज,बॅनर वर लढा राष्ट्र हिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा, नाशिकचा आवाज शांतीगिरीजी महाराज, शेतकऱ्यांचा,व्यापाऱ्यांचा, नोकरदारांचा आवाज,विद्यार्थ्यांचा, नारीशक्तीचा आवाज,गोरगरिबांचा, मजूरांचा आवाज शांतीगिरीजी महाराज असे फलक झळकत होते.रॅलीत नाशिक शहरातील व आश्रामीय संत,भाविक व हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group