ठाकरे गटाचे विद्यमान आमदार शिंदेंच्या संपर्कात? नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट
ठाकरे गटाचे विद्यमान आमदार शिंदेंच्या संपर्कात? नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट
img
Dipali Ghadwaje
विधान परिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू होण्याआधीच नाशिकमध्ये नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघातून टीडीएफ शिक्षक संघटनेकडून उमेदवारी मिळालेले संदीप गुळवे यांना ठाकरे गटाचा देखील पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच किशोर दराडे हे शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.  

विधानपरिषदेच्या उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समजतेय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group