मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहुर्त ठरला? महायुतीत कोणात्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार?
मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहुर्त ठरला? महायुतीत कोणात्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार?
img
Dipali Ghadwaje
नरेंद्र मोदींनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडत असतानाच दुसरीकडे राज्याच्या  राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलेली आहे. 

राज्यातील महायुती सरकारमधील इतके दिवस रडखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच पार पडणार असल्याची माहिती आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळातील सर्व रिक्त पदं भरली जाणार असल्याची माहिती आहे. 

महामंडळाचे देखील वाटप करण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकीत मोठा फटका महायुतीला सहन करावा लागला आहे, त्याच अनुषंगाने आगामी निवडणुकीआधी आमदारांना बळ देण्यासाठीचा हा महायुतीचा प्रयत्न असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. त्यामुळे कोणत्या आमदारांना किती मंत्रिपदं मिळणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

विधीमंडळाचे पावसाची अधिवेशन २७ जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनापूर्वीच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा आहे. राज्यासह देशात आत्ताच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.
 
कोणाला किती मंत्रीपद मिळणार?

मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील मित्रपक्षांना कोणाला किती मंत्रिपदं मिळणार, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, गेल्या मंत्रीमंडळ विस्तारापासून प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार, असं सूत्रांची माहिती आहे. संदिपान भुमरे हे खासदार झाल्याने त्यांची एक जागा रिक्त झाली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी ३ मंत्रिपदे मिळू शकतात, अशी शक्यता आहे. याबासंबधीचे वृत्त एका वृत्त वाहिनीच्या सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group