लोकसभेत जो झटका तोच झटका विधानसभेलाही…
लोकसभेत जो झटका तोच झटका विधानसभेलाही… "या" नेत्याचा महायुती सरकारला इशारा?
img
Dipali Ghadwaje
बुलढाण्यातून पहिल्यांदाच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नुकतीच लोकसभा निवडणूक लढवली. मात्र अवघ्या काही फरकांनं त्यांना हार मानावी लागली तर या मतदारसंघातून त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतापराव जाधव यांचा विजय झाला आणि ते बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले. 

दरम्यान, यावर रविकांत तुपकर यांनी भाष्य करत आपल्यापराभवाची कारणंही सांगितले आहे. ‘शपथविधी झाला असेल आणि राज्यातील राजकीय नेत्यांचं राजकारण संपलं असेल तर आता राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. 

लोकांना बियाणं मिळत नाही.पिक कर्ज मिळत नाही. ज्यांना निवडून दिलं त्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांचा मोठा असंतोष आहे. एकावेळी शेतकऱ्यांच्या संयंमाचा बांध तुटू शकतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लोकसभेत जो झटका दिला तोच झटका विधानसभेलाही देतील’, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group