"हा कचरा BMC office समोर ओतला तर चालेल का"? शशांक केतकर संतापला
img
दैनिक भ्रमर
मुंबई : सामाजिक-राजकीय मुद्यांवर निर्भिडपणे मराठी लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर भाष्य करतो. आता शशांकने व्हिडीओ शेअर करत मुंबई महानगरपालिकेवर संताप व्यक्त केला आहे. शशांक केतकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या शशांकने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. शशांक अभिनयाबरोबरच त्याच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखला जातो. समाजात दिसणाऱ्या आणि घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल तो नेहमीच सोशल मीडियावरुन परखडपणे त्याचं मतं मांडताना दिसतो. आतादेखील शशांक मुंबईतील फिल्म सिटीच्या बाहेर रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत रस्त्यावर कचऱ्याचा ढीग पाहायला मिळत आहे. हे पाहून शशांकने व्हिडिओतून संताप व्यक्त केला आहे. "हा कचरा BMC office समोर ओतला तर आवडेल का?", असा खोचक सवालही त्याने पोस्टमधून विचारला आहे.


फिल्म सिटीपासून अर्ध्या किमीच्या अंतरावर स्वच्छतेची अशी अवस्था आहे. परदेशातील लोक बसचं तिकीट काढून फिल्म सिटी बघायला येणाऱ्या लोकांना हे चित्र दिसणार..कमाल..शू शू..कुठे बोलायचं नाही..काठावरचा इंजिनियर. ही अवस्था खरं तर टाऊन प्लानिंग करणाऱ्यांची आहे. आपल्या शहरातील कचरा मॅनेज करणाऱ्यांची आहे. या व्हिडिओत तुम्ही जो कचरा पाहिला तो मागच्या अर्ध्या तासापूर्वी मी फिल्म सिटीमध्ये येताना हा कचरा मला दिसला. कोणीही मुंबईत आल्यावर फिल्म सिटी बघायची इच्छा होते..पण, फिल्म सिटीच्या अर्ध्या किमी अंतरावर हा जो काही छान, निसर्गरम्य परिसर करून ठेवला आहे..BMC, नागरिक की कचरा मॅनेज करणारी टीम? यात नक्की चूक कोणाची आहे? की कोणाचीच चूक नाहीये? आपण कोडगे झालोय? किती छान, मस्त..फार उत्तम मुंबई दिसतेय.." असं शशांक व्हिडिओत म्हणत आहे.

शशांकने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, मेरा भारत महान. मोदीजी असोत, राहूलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाहीये. 

मुंबईची फिल्मसिटी बघायला भारतातून, जगभरातून लोक येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची ???? ही अवस्था , हे चित्र काही आजचं नाहीये… मी गेल्या १० वर्षात ती जागा कधीच स्वच्छ पाहिली नाहीये. इतकी उदासीनता का? असा सवालही शशांकने केला आहे. 

अभिनेत्री अभिज्ञा भावेनेदेखील शशांकच्या मताशी सहमती दर्शवली. राजकारणावर भाष्य करताना आपण आपली जबाबदारीदेखील विसरून गेलो आहोत. इतरांच्या जबाबदाऱ्यांवर निबंध लिहिले जातील, पण स्वत:च्या जबाबदाऱ्या बजावण्याची वेळ येते तेव्हा कारणांची यादी असते. आपल्या सगळ्यांना कचऱ्यात राहायला आवडतं असेही तिने म्हटले.  शशांकच्या चाहत्यांनीदेखील त्याच्या या मताशी सहमती दर्शवत नागरिकांनी जबाबदारी पार पाडली पाहिजे असे मत व्यक्त केले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group