महाराष्ट्र चेंबरच्या प्रयत्नांना यश ; नाशिक बंगलोर विमानसेवा
महाराष्ट्र चेंबरच्या प्रयत्नांना यश ; नाशिक बंगलोर विमानसेवा "या" तारखे पासून सुरु होणार
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरतर्फे व्यापारी औद्योगिक दृष्टिकोनातून देशातील व राज्यातील महत्वाची शहरे हि विमानसेवेद्वारे जोडली जावी यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या एविएशन समितीचे काम सुरु आहे.  यासंदर्भात चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, नवनिर्वाचित उपाध्यक्ष संजय सोनवणे, एव्हिएशन समितीचे मनीष रावल यांनी नामदार  ज्योतिरादित्य  सिंधिया यांच्याकडे मागील काळात पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून 10 सप्टेंबर पासून इंडिगो कंपनीतर्फे नाशिक ते बेंगलोर विमानसेवा नियमित सुरू होणार आहे.

नाशिक  बेंगलोर विमानसेवा सुरु झाल्यावर नाशिकच्या व्यापार- उद्योग वाढीच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. आयटी उद्योगांच्या दृष्टीने ही विमानसेवा फायदेशीर ठरेल.

देशातील व राज्यातील औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना विमान सेवेद्वारे जोडण्यासाठी एव्हिएशन समितीच्या मार्फत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय भारतातील इतरही  महत्वाच्या शहरांना नाशिकहून थेट विमान सेवेद्वारे जोडण्यासाठी व गुजरात, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक यासह विविध राज्यांमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधून विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार नाशिक ते दिल्ली व जळगाव ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. व्यापार उद्योग वाढीच्या दृष्टिकोनातून नाशिक बेंगलोर ही विमानसेवा ही तितकीच महत्त्वाची असल्याने त्यासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. चेंबरच्या या पाठपुराव्याला यश आले. नाशिक बेंगलोर विमानसेवा सुरु करण्यासाठी उपाध्यक्ष कांतीलाल चोपडा, नवनिर्वाचित उपाध्यक्ष संजय सोनवणे, नवनिर्वाचित शाखा चेअरमन अंजु सिंघल, कार्यकारिणी सदस्य मनिष रावल यांनी विशेष प्रयत्न केले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group