नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न... सभासदांना आठ टक्के लाभांश अध्यक्ष गायकवाड यांची घोषणा
नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न... सभासदांना आठ टक्के लाभांश अध्यक्ष गायकवाड यांची घोषणा
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी): उत्तर महाराष्ट्रामधील प्रमुख अर्थ वाहिनी समजल्या जाणाऱ्या दि. नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सभासदांना ८टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

बँकेची ६२वी सर्वसाधारण सभा अध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तर बँकेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे,उपाध्यक्ष मनोहर कोरडे, जनसंपर्क संचालिका रंजना बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री हरी लॉन्स येथे पार पडली.

व्यासपीठावर संचालक डॉ. प्रशांत भुतडा,वसंत अरिंगळे, जगन्नाथ आगळे, सुनील आडके, गणेश खर्जुल, नितीन खोले, श्रीराम गायकवाड, सुनील चोपडा, अशोक चोरडिया, अरुण जाधव, रमेश धोंगडे, योगेश नागरे, विलास पेखळे, सुधाकर जाधव, प्रकाश घुगे, रामदास सदाफुले, कमल आढाव, तज्ञ संचालक सुदाम गायकवाड, राहुल हगवणे, व्यवस्थापन समितीचे सदस्य अजित बने, दिपक बलकवडे, ऍड पद्मा थोरात,कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागिरे,कर्मचारी प्रतिनिधी मंगेश फडोळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम आदी उपस्थित होते.

सभासदांनी बैठकीत बँकेचे अध्यक्ष तथा पॅनलचे नेते दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे यांच्या सहकार क्षेत्रातील कार्यबद्दल गुणगान करून यंदा तरुणांना उमेदवारी देऊन युवा वर्गाला प्रतिनिधित्व दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला व आभार मानले. 

तसेच शिंदे-पळसे येथे शाखा सुरू करावी, बँकेने ज्या सभासदाचे पाल्य केंद्रीय व राज्य सरकार आयोगाच्या परीक्षा पास झाले त्याचा गौरव करावा,सभासदासाठी आलेल्या मृत्युजय निधी मध्ये वाढ करून दहा हजार ऐवजी पंचवीस हजार करावी, अपघात विमा मध्येही वाढ करून पाच लाख करावा, दुकान परवाना वर दिले जाणारे एक लाखाचे कर्ज वाढवून तीन लाख करावे,महिला बचत गट यांना कर्ज पुरवठा करावा,बँकेतील कर्मचारी यांची वेतन वाढ करावी व त्याचा विमा रकमेत वाढ करावी,कर्ज काढतांना सरकारी जमीनदार ऐवजी सक्षम जामीनदार घ्यावा,ब वर्ग सभासद यांना सोने तारण वर एक लाख ऐवजी तीन लाखापर्यंत कर्ज पुरवठा करावा, दुचाकी घेतांना जाचक अटी शिथिल करण्यात याव्या, सभासद व बँक प्रशासन यांच्या समन्वय असण्यासाठी अभ्यासक समिती स्थापन करण्यात यावी, तातडीचे कर्ज मिळण्याची सुविधा करावी, जेष्ठ नागरिकांना एक टक्का अधिक व्याज देण्यात यावे,शेतकरी यांना देण्यात येणाऱ्या कर्जाला तीन वर्षांची मुदतवाढ द्यावी अश्या सूचना सभासदांनी मांडल्या.सभेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम यांनी समर्पक उत्तरे दिली.

तसेच यापैकी अनेक सूचनांची अंमलबजावणी झाली असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर सर्व सूचना व्यक्त करणाऱ्या सभासद यांनी समाधान व्यक्त केले. सभा संपल्या नंतर अनेक सभासद यांनी अध्यक्ष गायकवाड, अरिंगळे यांचा सत्कार केला.

सभेस राजेंद्र ताजने, प्रशांत दिवे,रमेश औटे,दिनकर आढाव,भाईजान बाटलीवाला, दिलीप आहिरे, बाबुराव आढाव, मुकेश करंजगावकर, संजय 
करंजगावकर,संजय तुंगार, भास्कर गोडसे,शिवाजी हंडोरे, राजेश आढाव, साहेबराव खर्जुल, दिलीप गायधनी, विक्रम कोठुळे, चैतन्य देशमुख,जगन गवळी,अतुल धोंगडे,राजेश आढाव,कुलदिल आढाव, लाला जैन, अशोक खालकर, शिवाजी म्हस्के, सुनील महाले, नारायण मुठाळ, सुरेखा निमसे, शाम हंडोरे,विलास गायधनी,पाळदे,प्रवीण वाघ, भारत भोई आदी सह सभासद,हितचिंतक व व्यापारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. आभार उपाध्यक्ष मनोहर कोरडे यांनी व्यक्त केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group