वर्क फ्रॉम होम देण्याच्या बहाण्याने चार जणांना ६० लाख ५० हजार रुपयांचा गंडा
वर्क फ्रॉम होम देण्याच्या बहाण्याने चार जणांना ६० लाख ५० हजार रुपयांचा गंडा
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- वर्क फ्रॉम होम देण्याचा बनाव करून अज्ञात टेलिग्रामधारक इसमांनी चार जणांना सुमारे 60 लाख 57 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून, भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अज्ञात इसमांनी वर्क फ्रॉम होम देण्याचा बनाव करून टेलिग्राम आयडीधारक व वेगवेगळे लिंकधारक, तसेच फेक मेलधारक यांनी फिर्यादी, तसेच साक्षीदार राजधर पोपट याने वेगवेगळ्या लिंक पाठवून राजधर पोपट पाटील यांना अपोलो ग्लोबल फायनान्शिअल व्हीआयपी-1551 या व्हॉट्सॲप ग्रुपमधील सांची अरोरा, रवींद्र उस्मान या नावांच्या इसमांनी व्हॉट्सॲप क्रमांकांवरून अपोलो मॉर्सेल नावाच्या ॲपमधील लिंकधारकाने शेअर मार्केट ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखविले. 

त्यानंतर त्याने 24 लाख 22 हजार रुपये व साक्षीदार मनीषा मोहन पाटील यांना एच. डी. एफ. सी. सिक्युरिटीज्‌‍ या व्हॉट्सॲप ग्रुपमधील रमादेवी पटेल व सेनगुप्ता अभिजित सिंग या नावांच्या इसमांनी व्हॉट्सॲप क्रमांकांवरून पुन्हा फिर्यादी व साक्षीदार यांना शेअर मार्केट ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखविले व त्यानुसार एकूण 7 लाख 70 हजार 100 रुपये स्वीकारले, तर अन्य साक्षीदार सनत शंकर चक्रवर्ती यांनाही अशाच प्रकारचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही 5 लाख 51 हजार रुपयांची रक्कम इंटरनेट व फोनद्वारे स्वीकारली. 

या प्रकरणात फिर्यादीसह साक्षीदार राजधर पाटील, मनीषा मोहन पाटील, सनत शंकर चक्रवर्ती या चौघा जणांची एकूण 60 लाख 57 हजार 449 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.



इतर बातम्या
Join Whatsapp Group