वसंत मोरेंचं नक्की काय ठरलं ! इंजिन,रोड रोलर की मशाल ?
वसंत मोरेंचं नक्की काय ठरलं ! इंजिन,रोड रोलर की मशाल ?
img
Jayshri Rajesh
पुण्याच्या वसंत मोरे यांनी नवा राजकीय निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंचे विश्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरेंनी लोकसभा निवडणुकीत मनसेची साथ सोडली. काँग्रेस राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. शिवाय त्यांना पुणे लोकसभेची उमेदवारीही मिळाली. पण मोरे त्यात त्यांचा पराभव झाला. शिवाय त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले. 

आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता वसंत मोरेंनी नवी इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ते वंचितची साथ सोडणार असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.त्यांच्या पक्षा प्रवेशाची तारीखही निश्चित झाली असुन  ९ जुलैला आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

लोकसभेत शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी मोरे यांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती. पण आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असल्याने मोरे यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. आता मात्र मोरे यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मनसे, वंचितनंतर मोरे आता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
 
कोण आहेत वसंत मोरे?

वसंत मोरे हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत. ते पुणे मनसेचे शहर अध्यक्षही होते. पालिका अधिकाऱ्याची  गाडी त्यांनी हातोड्याने फोडली होती. त्यानंतर ते चर्चेत आले होते. एक आक्रमक नेते म्हणून त्यांची पुण्याला ओळख आहे. पुणे लोकसभेची जागा मनसेने लढवाली अशी त्यांची मागणी होती. तशी इच्छाही त्यांनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली होती. राज यांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणूनही त्यांची ओळख होती. पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. शिवाय त्यांचे आणि अमित ठाकरे यांचेही बिनसले. त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला.

मोरे यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी ती निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना अपयश आले.आता  मात्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीला ते लागले आहेत. त्या दृष्टीनेच ते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.  विधानसभा डोळ्या समोर ठेवून मोरेंचा पक्ष प्रवेश होत असल्याची चर्चा सुरु आहे.   
इतर बातम्या
Join Whatsapp Group