गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर्वांगीन प्रगतीत गोसावी यांचे  योगदान मोलाचे : माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर...
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर्वांगीन प्रगतीत गोसावी यांचे योगदान मोलाचे : माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर...
img
Mukund Baviskar
नाशिक : शिक्षणात खूप मोठी ताकद आहे. नवीन शैक्षणिक धोरण ठरवतांना अभ्यासाबरोबरच प्रयोगशीलता, नावीन्यता, संशोधक वृत्ती, सामाजिक बांधिलकी, आवडीचे,आनंददायी शिक्षण या सर्व गोष्टी प्रत्यक्षात आधीच अमलात आणण्यासाठी गोसावी सरांनी प्रयत्न केले. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर्वांगीन प्रगतीत गोसावी सरांचे योगदान मोलाचे आहे. आजवर मला भावलेल्या १० व्यक्तींमध्ये गोसावी सरांचा समावेश आहे. संस्थेच्या माध्यमातून उत्तम,आदर्श विद्यार्थी घडोत , " असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी केले.

नाशिक येथील  गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मंगळवार दि. ९ जुलै २०२४ रोजी  संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ञ स्व.सर डॉ मो. स. गोसावी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी विशेष अतिथी नाशिक येथील नामवंत औषधशास्त्रज्ञ डॉ. राहुल फाटे,  विशेषअतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन तज्ञ डॉ. विजय गोसावी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.  नितीन करमाळकर,  तर अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार , मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे, संस्थेचे प्रेसिडेंट डॉ. आर. पी. देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुहासिनी  संत , प्रकल्प संचालक प्राचार्य प्रदीप देशपांडे,आस्थापना संचालक  शैलेश गोसावी , संस्थेचे नाशिक विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी , प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते . 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. डॉ. मो. स. गोसावी सरांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले, तसेच वरण्ये या सभागृहाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . ह्या पसंगी अध्यारू कुटुंबिय उपस्थित होते . ह्या प्रसंगी पुष्पांजली, शांतीपाठ म्हणण्यात आले तसेच सर डॉ. मो. स. गोसावी स्मृतिपर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच संस्थेचे माजी सचिव व महासंचालक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ  स्व.सर डॉ. मो. स. गोसावी यांना आदरांजली वाहण्यात आली.  त्यानंतर संशोधनपर जर्नल ' स्वयंप्रकाश ' चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .  यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . सुहासिनी संत यांनी केले .  यावेळी राहुल फाटे यांनी सर डॉ. मो. स. गोसावी यांना महर्षी ही पदवी प्रदान केली .  संस्थेचे प्रेसिडेंट आर. पी. देशपांडे यांनी स्वीकारली. 

तसेच याप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा व महाविद्यालयातील १० वी व १२ वी तील गुणवंत टॉपर्सचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. यावेळी सत्कारार्थी विद्यार्थ्यांच्या वतीने एकलव्य गोयल व आरती देवचक्के यांनी मनोगते व्यक्त केली. 

अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. दीप्ती देशपांडे यांनी सांगितले की , संस्थेचे प्रेरणास्रोत सर डॉ. गोसावी सरांनी संस्थेचे संस्थापक प्रिं. टी. ए. कुलकर्णी यांनी लावलेले रोप त्याचे वटवृक्षात रूपांतर केले आहे. संस्थेचे विद्यार्थी देवो भव हे ब्रीद सरांनी कधी सोडले नाही. ज्ञानदान श्रेष्ठ मानले. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते आपल्याकडे असावे यावर सरांचा भर होता. त्यांच्यामुळेच गोखले एज्युकेशन सोसायटी राष्ट्रकल्याणार्थ जागतिक दर्जाचा आदर्श नागरिक घडावणारी संस्था आहे, असे सांगितले. 

विशेष अतिथी राहुल फाटे यांनी आपल्या मनोगतात देवर्षी,राजर्षी, ब्रम्हर्षी या तीनही जणांचा एकत्रित संगम म्हणजे महर्षी. असे शिक्षण क्षेत्रातील महर्षी सर डॉ गोसावी सर होय. असे सांगितले.  प्रमुख अतिथी विजय गोसावी यांनी आपल्या मनोगतात गोसावी सरांचे कार्य अजरामर राहील. त्यांचा लोकसंग्रह खूप होता.  असे सांगितले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. डॉ. स्नेहा रत्नपारखी व प्रा. मुग्धा जोशी यांनी केले तर आभार संस्थेचे विभागीय सचिव प्राचार्य  डॉ . राम कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास सर्व गोसावी कुटुंबिय संस्थेतील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख,देणगीदार , प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सत्कारार्थी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येन उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ .लीना भट व सर्व सहकारी यांनी परिश्रम घेतले . 
इतर बातम्या
Join Whatsapp Group