मुंबई : सध्या अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुराकडे जात आहे. राज्यभरातून हजारो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. या वर्षी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी वारीत सहभागी होत विठुरायाच्या चरनी नतमस्तक होण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे दिग्गज नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील वारीत सहभागी होण्याचं ठरवलं आहे. ते रविवारी म्हणजेच येत्या 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार आहेत.
राहुल गांधींनी आमंत्रण स्वीकारले
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी वारीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांनी वारीत सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. गांधी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून ते पहिल्यांदाच वारीत सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूवी राहुल गांधींचा 13 किंवा 14 जुलै रोजी वारीत सहभागी होतील असे सांगण्यात येत होते. आता मात्र त्यांच्या या दौऱ्यासाठी 14 तारीख निश्चित करण्यात आली आहे.