नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- सिन्नर फाटा, चेहडी शिव येथील युवकाच्या हत्या प्रकारणातील दुसऱ्या संशयितास नाशिकरोड पोलिसाच्या गुन्हे शोध पथकाने शिताफिने ताब्यात घेतले.
शुक्रवारी संध्याकाळी चेहडी शिव येथील जमिनीच्या वादातुन प्रमोद केरू वाघ (वय 40) या युवकाची हत्या करण्यात आली होती.
याप्रकारणी सद्दाम मलिक व योगेश पगारे यांच्या विरोधात नाशिकरोड पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील प्रमुख संशयित सद्दाम मलिक यास युनिट 1च्या पथकाने काही तासात ताब्यात घेतले तर आज दुपारच्या सुमारास इच्छामणी मंदिरामागे दडून बसलेला दुसरा संशयीत योगेश रामदास पगारे यास नाशिकरोड पोलीसातील गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, हवालदार विष्णू गोसावी, संदिप पवार, गोकुळ कासार, सागर आरणे, दत्ता वाजे यांनी केली.