सातपुर - बांधकामासाठी कोरलेल्या खड्ड्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेने सातपूर परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर येथील श्रमिक नगर परिसरामध्ये बांधकामाचे काम सुरू आहे. या ठिकाणी अंकुश गाडे, प्रणव सोनटक्के हे दोन्ही शाळकरी युवक शाळा सुटल्यानंतर पाच वाजेच्या सुमारास घरी जात असताना पोहण्यासाठी पाण्यामध्ये उतरले.
त्यांच्याबरोबर असलेले अजून तीन शाळकरी मुलं हे सर्व पोहत असताना अचानक अंकुश काळे आणि प्रणव सोनटक्के हे दोघेजण न दिसल्यामुळे त्यांनी दोघांचा शोध सुरू केला. परंतु ते दिसून आले नाही. त्यानंतर तातडीने या तीन मित्रांनी बाहेर येऊन आजूबाजूच्या नागरिकांना याबाबतची माहिती दिली आणि बांधकामासाठी पावसामुळे जे पाणी साचले होते.
त्या पावसामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये असलेल्या या दोन शाळकरी मुलांना शोधून त्यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मुलांवर उपचार सुरू होते; मात्र नऊ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.