धक्कादायक ! किरकोळ वादातून पतीनं पत्नीला विहिरीत ढकललं, बुडून मृत्यू
धक्कादायक ! किरकोळ वादातून पतीनं पत्नीला विहिरीत ढकललं, बुडून मृत्यू
img
दैनिक भ्रमर
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, पतीनं पत्नीला विहिरीत ढकललं, या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे.  घरगुती वादातून पतीनं पत्नीला विहिरीत ढकललं. पत्नीला पोहता येत नसल्यानं या घटनेत तिचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सटाणा तालुक्यातील खिरमानी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. योगिता भदाणे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव असून, या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती देविदास भदाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान , घटनेबाबत अधिक माहिती अशी की, किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना सटाणा तालुक्यातील  खिरमानी येथे घडली आहे, योगिता भदाणे असं या घटनेतील मृत महिलेचं नाव आहे. योगिता भदाणे यांना पोहता येत नव्हते. त्यामुळे विहिरीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आरोपी देविदास भदाणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group