विमानात 6 महिन्यांच्या बाळाचा श्वास गुदमरला अन झाले असे....
विमानात 6 महिन्यांच्या बाळाचा श्वास गुदमरला अन झाले असे....
img
दैनिक भ्रमर
दिल्ली :- विमानात अचानक 6 महिन्यांच्या बाळाची तब्येत बिघडल्याने बाळाच्या पालकांसह प्रवासीही घाबरले. त्या बाळाचा श्वास एकदम गुदमरला. यावेळी त्या विमानात असलेल्या एका डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करत त्याचे प्राण वाचवले. इंडिगो एअरलाईन्सच्या रांची ते दिल्ली फ्लाईटमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. 

डॉ. नितीन कुलकर्णी असे या देवदूताचे नाव आहे. इंडिगो फ्लाईटक्रू मेंबर्सने सर्तकता दाखवत विमानात कुणी डॉक्टर असल्यास बाळावर उपचार करण्याचे आवाहन केले. झारखंडच्या राज्यपालांचे असलेले सरचिटणीस डॉ. नितीन कुलकर्णी यांनी प्रसंगावधान दाखवत त्या बाळावर उपचार केले आणि त्याचा जीव वाचवला. 

विमान 30 फूट उंचीवर असताना अचानक सहा महिन्यांच्या बाळाची तब्येत बिघडली. यावेळी डॉ. नितीन कुलकर्णी आणि डॉ. मोजम्मिल फिरोज यांनी बाळावर उपचार करत मदत केली.

विमान आकाशात 30 फूट उंचीवर असताना बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे बाळाचे पालक घाबरले होते. यानंतर विमानातील ऑक्सिजन आणि इतर उपलब्ध औषधांच्या सहाय्याने डॉक्टरांनी बाळावर उपचार केले. काही वेळाने बाळाची तब्येत सुधारली. यानंतर डॉक्टरांसह बाळाच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला. एका तासानंतर विमान लँड झाल्यानंतर बाळाला वैद्यकिय पथकाच्या देखरेखीखाली नेण्यात येऊन त्याला ऑक्सिजन सपोर्ट देण्यात आला.

या बाळाला जन्मजात हृदयविकाराचा त्रास असल्याचे समजते. त्याच्यावर  उपचार करण्यासाठीच त्याला दिल्लीला घेऊन जात होते. आयएएस अधिकारी नितीन कुलकर्णी यांनी सांगितलं की, बाळाचे कुटुंबीय त्यांच्यासोबत डेक्सोना इंजेक्शन घेऊन आले होते. यामुळे उपचारामध्ये मोठी मदत झाली.

इंजेक्शन आणि ऑक्सिजननंतर, बाळाच्या तब्येतीमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. चिमुरड्याचे प्राण वाचवल्याबद्दल विमानामधील इतर प्रवाशांनी दोन्ही डॉक्टरांचे अभिनंदन केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group