दुर्दैवी ! तब्बल महिनाभरानंतर पटली मृत बालकाची ओळख; ''या'' कारणावरून गळा आवळून खून
दुर्दैवी ! तब्बल महिनाभरानंतर पटली मृत बालकाची ओळख; ''या'' कारणावरून गळा आवळून खून
img
दैनिक भ्रमर
भुसावळ मधील साकेगाव  शिवारातील एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलीये . तब्बल १० दिवसानंतर मी, मृत बालकाची ओळख पटली. ही अत्यंत दुःखदायक घटना असून , साकेगाव  शिवारातील नवोदय विद्यालयाच्या पाठीमागे १८ जुलैला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. महिनाभरानंतर मृताच्या आईने कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटवली.

त्याच्यासोबत राहणाऱ्या साथीदारानेच त्याचा खून केल्याची खात्री झाल्याने कुटुंबीयांनीच संशयित विधी संघर्षीत बालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय महामार्गावर नवोदय विद्यालयाच्या पाठीमागून उग्रवास येत असल्याने भुसावळ तालुका पोलिसांनी पाहाणी केल्यावर कुजलेल्या मृतदेह आढळला होता. मृतदेहाचा पंचनामा करून विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला. शवविच्छेदन अहवालावरून गळा दाबून त्या तरुणाचा खून केल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत पोलिस कर्मचारी संजय भोई यांच्या तक्रारीवरून भुसावळ तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलिसांनी मृताच्या कुटुंबाचा शोध घेतला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group