आज घरोघरी होणार गौरींचे सोनपावलांनी आगमन...
आज घरोघरी होणार गौरींचे सोनपावलांनी आगमन...
img
दैनिक भ्रमर
नाशिक दि. १० ( भ्रमर प्रतिनिधी ) : गणरायाच्या आगमना पाठोपाठ आता घरोघरी गौरी ( गौराई तथा महालक्ष्मी ) हिचे सोनपावलांनी आगमन होणार आहे .आज मंगळवार, दि. १० रोजी जेष्ठा आणि कनिष्ठा गौरी तीन दिवसासाठी माहेरी येणार असून त्यांच्या स्वागताची घरोघर जिल्ह्यात तयारी सुरू आहे. ज्येष्ठ गौरी आवाहन हा नाशिकसह राज्यातील अनेक उत्सवांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. भाद्रपद महिन्यात शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते. 

गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण, गणेशोत्सवादरम्यान उत्साहात साजरा केला जातो. या सणाची सुरुवात ज्येष्ठा गौरी आवाहनाने होते आणि त्यानंतर गौरी पूजन व गौरी विसर्जनाने समाप्ती होते. तीन दिवस हा सण साजरा केला जातो. यंदा १० सप्टेंबर रोजी या सणाला सुरुवात झाली असून दि. १२ सप्टेंबर रोजी समाप्ती होणार आहे. दरम्यान, गौरीच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत पूजेच्या साहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग दिसून आली ठिकठिकाणी फळे फुले विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ गजबजली होती. 

या सणाच्या तिसर्‍या दिवशी मूल नक्षत्रात गौरीचे खीर-कानवल्याचा नैवेद्य दाखवून विसर्जन करतात. या दिवशी कापसाचे गाठ बांधतात. सूतमध्ये हळद, कोरडे फळे, तमालपत्र, फुलं, झेंडूची पाने, काजूची फुलं, रेशीम धागा मिसळतात. गौरी पूजन करुन आरती करतात. परंपरेनुसार मुखवटे हालवण्यात येतात, खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.

गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा सर्वीकडे वेगवेगळी आहे. काही कुटुंबांमध्ये गौरीचा मुखवटा आहे, तर काही पारंपारिकपणे जलाशयातून पाच, सात किंवा अकरा खडे वा दगड घेऊन त्यांना गौरीस्वरुप मानून पूजा करतात. काही ठिकाणी पाच भांडी उतार असून त्यावर गौरी मुखवटे लावले जातात. तर काही घरांमध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळी इत्यादी धान्याच्या ढीग साचून झाकलेले असतात. तर गौरीची चित्रे किंवा पत्रके देखील उपलब्ध आहे. ज्यांची मनोभावे पूजा केली जाते. 

महत्वाचे म्हणजे भाद्रपद शुद्ध सप्तमीला ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात, म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात. गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते. भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा पाहुणचार नीट सुरु आहे ना, जणू काही हे तपासायला ती येते. तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाट माट आनंदात केला जातो. मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते, अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही जाते.

तसेच प्रचलित कथेनुसार, माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे. गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे. म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

पद्मपुराणानुसार, समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती. लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीला चार हात होते. एका हाताने अभय मुद्रा, दुसऱ्या हातात वर म्हणजेच आशीर्वाद मुद्रा, तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते. ती नेहमी कमळावर विराजमान असते. पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते. 

विशेष म्हणजे पौराणिक मान्यतेनुसार, राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला होता. तेव्हा गौरीने असुरांचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले. त्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणूनही गौरीचे व्रत करतात. 

 
गौरीच्या आवाहनाचा शुभ मुहूर्त: १० सप्टेंबर रोजी रात्री ८.०२ मिंनिटांपर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करावे. ज्येष्ठा गौरी पूजन तिथी : २२ सप्टेंबर -ज्येष्ठा गौरी पूजन मुहूर्त : दुपारी १२ च्या आधी गौरी पूजन करून गौरीला नैवेद्य दाखवावा. ज्येष्ठा गौरी विसर्जन तिथी : २३ सप्टेंबर – ज्येष्ठा गौरी विसर्जन मुहूर्त : दुपारी १. ३१ ते रात्री ९.५१ मिनिटांपर्यंत आहे.


 
इतर बातम्या
Join Whatsapp Group