दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसतेय, लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही , अतिशय शुल्लक कारणांवरूनही आजकाल जीवघेणे हल्ले होऊ लागले आहेत. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ३३ वर्षीय व्यक्तीने त्याच्या जवळच्या मैत्रिणीवर चाकूने हल्ला केल्याची घटना मुंबई येथे घडली आहे. या घटनेनंतर मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. ही घटना भांडूप उपनगर परिसरातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव भांगे असं आरोपीचे नाव आहे. आरोपीने महिलेवर हल्ला केल्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन महिलेची चौकशी केली.
याविषयी अधिक माहिती अशी की , जखमी महिलेने पोलिसांना आरोपी ज्ञानदेव यांची तक्रार केली. महिलेने सांगितले की, गेल्या काही वर्षापासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दोघे ही चांगले मित्र होते. पंरतु काही दिवसांपासून मी ज्ञानदेव यांच्याशी संपर्कात नव्हती. त्याच्याशी बोलणे बंद केले. बोलणं बंद केल्याच्या रागातून ज्ञानदेवने हल्ला केला. हल्ल्यात मानेवर गंभीर दुखापत झाली. हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वत: वर हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, तक्रारीवरून आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि पीडितेवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.