नाशिकरोड उड्डाणपुलावर अपघात....विवाहित तरुणाचा मृत्यू
नाशिकरोड उड्डाणपुलावर अपघात....विवाहित तरुणाचा मृत्यू
img
Chandrakant Barve
 नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी): गाडेकर मळा सिन्नर फाटा येथील २९ वर्षीय युवक अमित राजेंद्र मिश्रा याचा आज सकाळी कामावर जात असताना दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित मिश्रा हे इंदिरानगर येथील डब्ल्यू एन एस या कंपनीत काम करीत होते. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या दुचाकी (MH 15GS 2925) वरून उड्डाणपुलावरून दत्त मंदिराच्या दिशेने निघाले होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक (MH 15FV 9891) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अमित मिश्रा हे विवाहित होते आणि त्यांच्या मागे पत्नी, लहान मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या अचानक झालेल्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा >>> काळीज हेलावून घटना! मुलगा बुडत होता, वडील मदतीला धावले, अन् अघटित घडलं......
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group