धक्कादायक : मध्यरात्री दरोडेखोर घरात शिरले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांचा मृत्यू , नेमकं काय घडले?
धक्कादायक : मध्यरात्री दरोडेखोर घरात शिरले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांचा मृत्यू , नेमकं काय घडले?
img
Dipali Ghadwaje
दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजू आसाराम हार्दे असे त्यांचे नाव असून खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. बुधवार रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास 6 दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. तत्पूर्वी दरोडेखोरांनी आजूबाजूच्या 7 ते 8 घरांना बाहेरून कडी लावून घेतली.

त्यानंतर दरोडेखोरांनी राजू हार्दे यांच्यावर धारदार शस्त्राने पोटात आणि डोक्यात वार केले. आसपासच्या घरांच्या दरवाजांना कड्या लावल्याने मदतीला कोणाला येता आले नाही.

त्यानंतर एक जण दरवाजाची कडी तोडून बाहेर त्यावेळी दरोडेखोरांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली.गंभीर जखमी झालेल्या राजू हारदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता अधिक तपास पोलीस करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group