दिवसेंदिवस गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. अगदी छोट्या मोठ्या कारणातून सुद्धा हत्या झाल्याचा घटना घडत असतात . दरम्यान अशीच एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाची निघृणपणे हत्या कल्याची घटना ठाणे येथे घडली आहे .
ठाण्यात ३५ वर्षीय तरुणाची हत्या करून त्याच मुंडकच छाटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच , हत्येनंतर मुंडके छाटून ते मृतदेहा शेजारीच ठेवण्यात आलं होतं. इमारतीच्या टेरेसवर ही हत्या करण्यात आली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
या विषयी अधिक माहिती अशी की , सोमनाथ सातगिरे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता. या प्रकरणी पोलिसांना त्याच्याच साथीदारावर संशय आहे. सोमनाथ हा सोसायटीत मुख्य सुरक्षा अधिकारी होता. त्याच्याच साथीदाराने ही हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. प्रशांत कदम या तरुणाने हत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. दरम्याना, हत्येचं कारण समोर आलेलं नाही. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे.