दिवसेंदिवस गुंडागर्दी आणि दादागिरी मध्ये चिंताजनक वाढ होताना दिसतेय . दार दिवशी वेगवेगळ्या घटना ऐकयला मिळतात दरम्यान अशीच एक धक्कादायक बातमी महाराष्ट्रातील बीड मधून समोर आली आहे .या ठिकाणी जेवणाचे बिल मागणाऱ्या वेटर ला चक्क कारमधून फरफटत नेल्याची संतापजनक घटना घडली आहे.
वेटरला ग्राहकांना जेवणाचे बिल मागणे महागात पडले आहे. अहवालानुसार, काही तरुण महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यावर वेटरने त्यांना बिल दिले मात्र त्यानंतर ते कारमधून पळू लागले. बिलासाठी वेटर त्यांच्या गाडीला लटकला, त्यानंतर गुंडांनी त्याला कारमध्ये 1 किलोमीटरपर्यंत फरपटत नेले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
निर्जनस्थळी कार थांबवून गुंडांनी वेटरला मारहाण करून, त्याच्या खिशातील 11 हजार हिसकावले. तसेच वेटरच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला रात्रभर कारमध्ये ठेवले. या घटनेनंतर पीडित तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरली असून, नागरिकांनी न्यायाची मागणी केली आहे.