भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार ! घटनेनं परिसरात खळबळ
भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार ! घटनेनं परिसरात खळबळ
img
दैनिक भ्रमर
दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत आहे . मारामारी, हत्या, गोळीबार अशा बऱ्याच घटना दरदिवशी घडत असतात , दरम्यान अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात घडली आहे . कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. कोपरगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ संबंधित गोळीबाराची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक तरुण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तन्वीर बालम रंगरेज असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी तन्वीरला उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संबंधित घटना ही आज संध्याकाळी साडे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली.

दरम्यान , कोपरगाव शहरात अतिशय वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आरोपीने थेट कारवर गोळीबार केला. या कारमधील तरुण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पण गोळीबार करणारा आरोपी कोण आहे? तसेच त्याचा उद्देश नेमका काय होता? ते अद्याप समजू शकलेलं नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group