“मला मुख्यमंत्री व्हायचंय, पण…” अजित पवारांनी जाहीर केली इच्छा,वाचा काय म्हणाले ?
“मला मुख्यमंत्री व्हायचंय, पण…” अजित पवारांनी जाहीर केली इच्छा,वाचा काय म्हणाले ?
img
दैनिक भ्रमर
आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सर्वच पक्षांकडून निवडणुकीत आपलीच बाजी असावी यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

“मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. पण मी उपमुख्यमंत्रीपदाच्या पलीकडे जाऊ शकत नाही”, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. अजित पवार म्हणाले, “२००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद आलं होतं. परंतु, त्यावेळी पक्ष नेतृत्त्वाने या पदावरा दावा सोडला आणि काँग्रेसला संधी दिली.”

तसेच , आगामी विधानसभा निडवडणूक महायुतीमधून लढवणार असून २०१९ मध्ये प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागांनुसार जागावाटप केले जाईल असं अजित पवार म्हणाले. “२०१९ मध्ये जिंकलेल्या जागांवर भाजपा जागा लढवणार आहे. तसंच, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठीही हेच सूत्र आहे. त्यामुळे २०० जागांवर जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट आहे. उर्वरित ८८ जागा मित्रपक्षांमध्ये विभागल्या जातील”, असं अजित पवार म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group