शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. शिंदे सरकारमधील मंत्री दादा भूसे आणि शंभूराज देसाई यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला होता. तसेच यांची नोर्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.
दरम्यान काल मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे तोंड बंद होणार, दोषींवर योग्य कारवाई करु, असे म्हटले होते. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आता सुषमा अंधारे म्हणाल्या, "तोंड बंद करणार म्हणजे काय करणार?. संपवून टाकाल.? नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना अडकवलं तसं अडकवाल?. देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र नाही झाला पाहिजे. जो कोणी ड्रग्जच्या विरोधात बोलेल त्यांनी शांत राहावे, अशी तुम्ही धमकी देत आहात. ललित पाटील नावाचा माणूस पळालो नाही तर मला पळवलं, असं का म्हणतो याचा शोध घ्या."
तसेच "माझ्याकडील सर्व पुरावे मी माध्यमांसमोर ठेवले आहेत. राज्याच्या यंत्रणेवर आक्षेप असतील तर केंद्राच्या यंत्रणेणे तपास करावा, अशी मागणी मी केली आहे. दादा भुसे यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली मी त्यांचे स्वागत करते. पण शंभूराज देसाई एवढे का चिडले? राज्य शुल्क विभागाचे मंत्री म्हणून देसाई नापास झाले. ड्रग्जचा कारखाना उभा राहतो आणि तुम्हाला माहित नाहीत तर तुमचं अपयश आहे", असे सुषमा अंधारे म्हणाल्या.