नाशिकमध्ये ठाकरे गटाचा विराट मोर्चा, 'असा' असेल मार्ग
नाशिकमध्ये ठाकरे गटाचा विराट मोर्चा, 'असा' असेल मार्ग
img
Dipali Ghadwaje
नाशिक : नाशिकजवळील शिंदे गावातील अमली पदार्थ प्रकरण राज्यभर गाजत असून धार्मिक नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकची ओळख आता गुन्हेगारीसही घेऊ लागली आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून शिंदे गावात ड्रग्ज निर्मिती केली जात होती. याच पार्शवभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारे ड्रग्ज प्रकरण, तसेच अंमली पदार्थ तस्करी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.

दरम्यान खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार असून पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी करण्यात आली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकसह राज्यभरात हे ड्रग्ज पोहचवले जात होते. यातील मुख्य संशयित ललित पाटील हाच यामागील सूत्रधार असल्याचे देखील उघडकीस येत आहे. तो एका गुन्हयांखाली तुरुंगात होता. मात्र आजारपणाचे कारण सांगून मागील काही महिन्यापासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. विशेष म्हणजे येथूनच तो ड्रग्जचे व्यवहार देखील करत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. त्यातच त्याने ससून रुग्णालयात पळ काढता नाशिकला मुक्कामही केला.

त्यामुळे हे सर्व सुरु असताना नाशिकमधील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे सांगता येईल. आणि याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी संजय राऊत हे नाशिकला आले असता त्यांनी पोलीस, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचा सहभाग असल्याशिवाय हे राजरोसपणे चालू राहू शकत नाही असा आरोप केला होता. त्यामुळे ठाकरे गट यावर आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. अखेर आज हा मोर्चा निघणार आहे.  शालिमार येथील ठाकरे गटाच्या कार्यालयापासून निघणार असून मध्यवर्ती भागातून हा मोर्चा रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल, असे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. 

नाशिक शहरात ड्रग्ज रॅकेट विरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली 11 वजाता मोर्चाला सुरुवात होणार आहे. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नाशिक काँग्रेसने देखील रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. त्यानंतर आज ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याने इतर पक्ष सहभागी होतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group