बनावट कागदपत्रांद्वारे कार स्वत:च्या नावे करून फसवणूक
बनावट कागदपत्रांद्वारे कार स्वत:च्या नावे करून फसवणूक
img
Dipali Ghadwaje
नाशिक (प्रतिनिधी) :- खोटी कागदपत्रे बनवून कार स्वत:च्या नावावर करून घेत सही केलेला चेक चोरून नेत फसवणूक केल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रणजित गुलाबराव परदेशी (वय 46, रा. शिवतेज सोसायटी, खुटवडनगर, नाशिक) यांच्या मालकीची जुनी मारुती 800 कंपनीची कार आहे. या कारची खोटी कागदपत्रे बनवून ही कार आरोपी विवेक उत्तम पालवे (वय 45, रा. सावतानगर, सिडको, नाशिक) याने स्वत:च्या नावे करून घेतली, तसेच फिर्यादी यांच्या घरातून विश्वास बँकेचा सही केलेला चेक चोरून नेत त्यांची फसवणूक केली.

हा प्रकार दि. 1 जुलै 2007 ते दि. 1 डिसेंबर 2008 या कालावधीत फिर्यादी यांच्या शिवतेज सोसायटीतील घरी घडला. या प्रकरणी आरोपी विवेक पालवे याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार टोपले करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group