नाशिक (प्रतिनिधी) :- येथील भाजपच्या माजी नगरसेवकाच्या पुत्राने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे, की भाजपचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांचा मुलगा संदीप याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी जवळीक वाढविली. दि. 10 जानेवारी ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत संदीपने पीडितेशी शरीरसंबंध ठेवून तिला गर्भवती केले. नंतर त्याने तिला लग्नास नकार देऊन दमबाजी केली.
अखेर पीडितेने पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.