भारतामध्ये विश्वचषक सुरु असतानाच क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताचे महान डाबखुरे फिरकी गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी भारतीय संघाचे कर्णधार पद देखील भूषवलं आहे.
बिशनसिंह बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसरमध्ये झाला होता. 1966 ते 1979 पर्यंत त्यांनी भारतीय संघासाठी कसोटी सामने खेळले आहेत. 22 कसोटी सामन्यात त्यांनी टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.
बिशन सिंह बेदी 1970 च्या शतकात स्पिन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी 22 टेस्ट सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून जबाबदार सांभाळली होती. बिशन सिंह बेदी याची भारतीय टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पिनर्समध्ये गणना केली जायची. त्यांनी टीम इंडियासाठी 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्यांनी 273 बळी घेतले होते.
बिशन सिंह बेदी यांनी पंजाब संघाकडून क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. बिशन सिंह बेदी 1968 मध्ये दिल्ली रणजी संघात सामील झाले. त्यानंतर ते अनेक वर्षे दिल्ली रणजी संघाचा भाग होते. बिशन सिंह बेदी यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बिशन सिंह बेदी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द एका दशकाहून मोठी होती. त्यांनी सुमारे 12 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि महान फिरकी गोलंदाज बिशनसिंह बेदी यांचं निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. १९६७ ते १९७९ या बारा वर्षांच्या कालावधीत बेदी यांनी ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या ६७ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या होत्या. बेदी यांनी १० वन डे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून सात फलंदाजांना माघारी धाडलं होतं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान फिरकी गोलंदाजांपैकी एक अशी बेदी यांची ओळख होती. भारताच्या बेदी, चंद्रशेखर, प्रसन्ना आणि वेंकटराघवन या फिरकी चौकडीची एका जमान्यात क्रिकेटविश्वात दहशत होती. १९६० आणि १९७०च्या दशकात बेदी यांच्या डावखुऱ्या फिरकी आक्रमणासमोर रथीमहारथी फलंदाजांची झालेली पंचाईत क्रिकेटविश्वानं पाहिली आहे.