आरक्षणासाठी देवळ्यात  संजय दहिवडकर यांचा समाधी घेण्याचा निर्णय
आरक्षणासाठी देवळ्यात संजय दहिवडकर यांचा समाधी घेण्याचा निर्णय
img
दैनिक भ्रमर

देवळा :- राज्य सरकारने तात्काळ  सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा समाधी घेण्याचा निर्णय तालुक्यातील दहिवड येथील सामाजिक कार्यकर्ते व अध्यक्ष ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी घेतला आहे. याबाबत दहीवडकर यांनी सोशल मीडियावर समाधी घेणार असल्याचा संदेश व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. 

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले असून , त्यांच्या पाठींब्या साठी राज्यभरातून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण, पुढाऱ्यांना गाव बंदी सारखे निर्णय घेतले जात आहेत. राज्य सरकारकडून अद्याप यावर निर्णय घेतला जात नसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर उमटला असून, देवळा तालुक्यातील  दहिवड येथील  संजय दहिवडकर यांनी सकल मराठा समाज बांधव ,बारा बलुतेदार , अठरा पगड जाती धर्मातील नागरिकांना  सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या हेतूने येथील  छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारा जवळ  समाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group