पिंपळगाव बसवंत येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुरेश बाबा पवार ( वय ७६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन नातवंडे, मुलगी असा परिवार आहे.
४ ऑक्टोबर १९४८ रोजी कळवणमधील मानूर या छोट्याशा गावात जन्मलेल्या पवार यांचा वैद्यकशास्त्रातील प्रवास पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील शिक्षणापासून सुरू झाला. त्यांनी बीएएम ॲण्ड एस आणि एलसीपीएस असे शिक्षण पूर्ण केले. १ सप्टेंबर १९७५ रोजी पिंपळगाव बसवंत येथे कृष्णा क्लिनिकची स्थापना केली.
ते आपल्या अनेक रुग्णांना बरे होण्याची खात्री देत. त्यांच्या ५० वर्षांच्या कार्यकाळात कधीही डगमगले नाहीत. त्यांनी गरीब, अपंग, लष्करी जवानांच्या कुटुंबियांवर मोफत उपचार केले. गोर-गरिबांचे डॉक्टर बाबा अशी त्यांची ओळख होती. सुरेश पवार यांनी अनेक लेख लिहीले ते महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रकाशित झाले आहेत.
डॉ. सुरेश बाबा पवार यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. अवयव दान व देह दान याबाबत ते आग्रही होते. त्यांनी मृत्यूपश्चात देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या निधनानंतर कोणतेही धार्मिक विधी करण्यात आले नाही.