धक्कादायक! चोरीच्या संशयातून तरूणांना झाडाला उलटे लटकवले आणि .....
धक्कादायक! चोरीच्या संशयातून तरूणांना झाडाला उलटे लटकवले आणि .....
img
Dipali Ghadwaje
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून एका तरूणाला झाडाला बांधून त्याच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आले आहे. शेळी चोरीच्या संशयातून ही घटना घडली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे ही घटना घडली आहे.
 
याबात अधिक माहितीनुसार, शेळी आणि कबुतर चोरल्याचा संशय या तरूणांवर होता. त्यानंतर त्यांना घरातून उचलून नेत झाडाला उलटं लटकावून त्यांच्यासोबत अमानुष कृत्य करण्यात आल्याची माहीती पीडितांच्या कुटुंबियांनी दिली आहे. 

दरम्यान मारहाणीमध्ये शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड आणि खंडागळे हे तरूण जबर जखमी झाले आहेत. त्यांना शिरापूर येथील हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी काही संघटनांनी आवाज उठवायला सुरूवात केली असून आरोपींचा तपास पोलिस घेत आहेत. तर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये तरूणांना झाडाला उलटं लटकावलेलं दिसत आहे. या घटनेनंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group