Nashik शॉर्टसर्किटमुळे घराला आग; संसार उपयोगी साहित्य जळून खाक
Nashik शॉर्टसर्किटमुळे घराला आग; संसार उपयोगी साहित्य जळून खाक
img
Dipali Ghadwaje
सिडकोतील तोरणा नगर परिसरातील उर्दू हायस्कूलच्या मागे असलेल्या चौथ्याशी स्कीम मधील एका घराला शनिवारी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी आग लागल्याने घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.  सुदैवाने घरातील मंडळी बाहेर असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

याबाबत मिळालेलया माहितीनुसार , ही आग लागली तेव्हा घरातील मंडळी भाजी घेण्यासाठी बाहेर पडले होते.  घरामध्ये पती-पत्नी, आई व दोन मुले असा परिवार आहे.  सदर खबर अग्निशमन दलाला कळतच त्यांनी अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी आणला, परंतु गल्लीबोळातून घटनास्थळी पोहोचण्यास नेहमीप्रमाणे अडचण निर्माण झाली.

अवघ्या पंधरा मिनिटात अग्निशमनदलाने येथील आग विझवून आटोक्यात आणली. परंतु घरातील टीव्ही, फर्निचर, कपाट गादी आदी साहित्य जळून भस्मसात झाले.

यावेळी सिडको अग्निशमन दलाचे  कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी मेहनत घेतली. सदर घराचे योगेश खैरनार हे भाडेकरू असल्याचे समजते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group