नाशिक : येथील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात कार्यरत कनिष्ठ महिला लिपिकास 2 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. छाया विनायक पवार असे लाच घेणाऱ्या महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळात व्यवसायासाठी दोन लाख सोळा हजार रुपये कर्ज मंजूर होण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने त्यांच्या मुलाच्या नावे कर्ज मंजूर होण्यासाठी छाया पवार यांनी तक्रारदाराकडे ३००० रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. यावेळी छाया पवार यांना तक्रारदाराकडून २००० रुपये लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.