सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक
सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक
img
दैनिक भ्रमर
नाशिक :- सिन्नरच्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सूर्यभान मुरलीधर निंबाळकर (वय 58) असे सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी भूमी अभिलेख कार्यालय सिन्नर येथे मौजे पिंपरवाडी सर्वे नं 154/7 गट स्कीम उतारा, गट नकाशा व पोट हिस्सा नकाशा नकला काढून देण्यासाठी दिनांक 25 जानेवारी रोजी अर्ज केला होता.

त्या अनुषंगाने आज तक्रारदार हे उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय येथे गेले असता निंबाळकर ने तक्रारदाराकडे 700 रुपये लाचेची मागणी केली. 700 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून 

सिन्नर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group