नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून 16 लाखांची फसवणूक
नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून 16 लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मुलाला नोकरी लावून देण्याचे खोटे आमिष दाखवून त्यासाठी 16 लाख रुपयांची रक्कम स्वीकारून नोकरी लावून न देता वृद्धाची फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विजय दत्तात्रेय थिगळे (वय 68, रा. चैत्रमधुरा अपार्टमेंट, मोदकेश्वर कॉलनी, इंदिरानगर) हे त्यांच्या मुलाला नोकरी लावून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यादरम्यान आरोपी योगेश वसंतराव मोरे (रा. कुसुमप्रेम अपार्टमेंट, सहदेवनगर, गंगापूर रोड) याने विजय थिगळे यांच्याशी संपर्क साधला. 

त्यानंतर थिगळे यांचा विश्वास संपादन करून आरोपी योगेश मोरे याने फिर्यादीच्या मुलाला नोकरीला लावून देण्याचे खोटे आमिष दाखविले, तसेच दि. 6 जून 2020 ते दि. 12 एप्रिल 2024 या कालावधीत वेळोवेळी 16 लाख 15 हजार 300 रुपयांची रक्कम स्वीकारली; मात्र नोकरीस लावून दिल्याबद्दलच्या ऑर्डर आयआर सीपीसी रेल्वे कंपनीचे नियुक्तिपत्र व ट्रेनिंगचे पत्र व आयकार्ड असे बनावट कागदपत्र तयार करून ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून फिर्यादी विजय थिगळे यांची फसवणूक केली. 
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात योगेश मोरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group