रात्री १२ वाजता हजारो भीमसैनिकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना
रात्री १२ वाजता हजारो भीमसैनिकांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना
img
दैनिक भ्रमर
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्ये रात्री 12वाजेला नाशिकरोड येथील पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करतांना जयंती अध्यक्ष रोहित निरभवणे, राज्याचे मंत्री छगनराव भुजबळ, शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, आनंद सोनवणे, संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, प्रशांत दिवे, पवन पवार, सन्नी वाघ, हरीश भडांगे, शरद मोरे, जगदीश पवार, भारत निकम, समीर शेख, राम बाबा पठारे, अमोल निकम, कामगार नेते जगदीश गोडसे,भाजपा मंडल अध्यक्ष शांताराम घंटे, कामगार नेते सतीश निकम,बापू सापुते,किरण मैड, विशाल घेगडमल, रोहन काकडे,आदि सह भीमसैनिकांनी उपस्थितीत राहून मानवंदना दिली.

अनेक भागातून भीमसैनिक रथातुन मोठ-मोठे हार घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या कडे रात्री उशिरा पर्यंत येत होते. रात्री 11:45 वाजेला भारतीय बुद्ध महासभाचे अध्यक्ष प्रवीण बागुल व सहकारी बौदयचारी यांनी सामुदायिक वंदना, बौद्ध वंदना,भीम सुस्ती घेतली व बरोबर बारा वाजेला अध्यक्ष रोहित निरभवणे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.या वेळी भीमसैनिकानी डी जे च्या तालावर ठेका धरला. अनेक निळे झेंडे फडकताना दिसत होते. 
 
 सकाळ पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिक गर्दी करीत होते. नाशिक रोड मध्ये विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सर्व राजकीय पक्षानी स्टेज उभारून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर चे जितेंद्र सपकाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक मनोहर कदम व पोलीस अधिकारी,पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group