Nashik : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून 18 जणांची 77 लाखांची फसवणूक
Nashik : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून 18 जणांची 77 लाखांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर


नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडून 18 जणांची 77 लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मार्च 2022 ते जून 2023 या कालावधीत आरोपी मधुकर कोळी (वय 59) व तेजस मधुकर कोळी (वय 60, दोघेही रा. कार्तिकेयनगर, खुटवडनगर, नाशिक) यांनी संगनमत करून फिर्यादी प्रकाश मारुती पवार (वय 55, रा. श्रीसंकुल सोसायटी, पांडवनगरी, कामटवाडा, नवीन नाशिक) व इतर त्यांच्या इतर सहकार्‍यांना शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फिर्यादी यांनी 14 लाख 18 हजार 100 रुपये, त्यांचे सहकारी महेश रामकृष्ण बडगुजर यांनी 1 लाख 84 हजार, राजेश हरिराम प्रजापती यांनी 76 हजार, राजेश विष्णू साळवे यांनी एक लाख, सुभाष पुंजाजी चव्हाण यांनी दोन लाख, चंद्रशेखर शांताराम सोनवणे यांनी एक लाख, विवेक उमाकांत गडकरी यांनी 3 लाख 20 हजार, राहुल सुभाष आव्हाड यांनी 5 लाख 66 हजार, पंकज बाळकृष्ण पवार यांनी 2 लाख 6 हजार, सुमित जीवन गायके यांनी 1 लाख 89 हजार, लिंबाजी संतोष सोनवणे यांनी 3 लाख 74 हजार 870, अनिता चिचाराम भांगरे यांनी 6 लाख 70 हजार 150, शंकर देवकिसन आव्हाड यांनी 70 हजार, सागर दत्तात्रय कोतवाल यांनी 9 लाख 11 हजार 400, रोहित रवींद्र रणखांबे यांनी 15 लाख 50 हजार व संजय प्रभाकर सूर्यवंशी यांनी 2 लाख 30 हजार रुपये अशी एकूण 76 लाख 85 हजार 520 रुपयांची रक्कम आरोपी मधुकर कोळी व तेजस कोळी यांच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी जमा केली; मात्र बरेच दिवस उलटूनही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेली रक्कमही परत मिळाली नाही व जादा परतावाही न मिळाल्याने फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मधुकर कोळी व तेजस कोळी या दोघांच्या विरुद्ध सुमारे 77 लाख रुपयांची फसवणूक करून अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group