कंपनीतील कर्मचाऱ्याच्या मदतीने  दोघांनी चोरल्या 25 टन सळ्या
कंपनीतील कर्मचाऱ्याच्या मदतीने दोघांनी चोरल्या 25 टन सळ्या
img
Prashant Nirantar
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- कंपनीतील कर्मचाऱ्याला हाताशी घेऊन दुसऱ्या कंपनीतील कामगारांनी 17 लाख 50 हजार  रुपये किंमतीच्या 25 टन सळ्या चोरून नेल्या.  ही घटना पाथर्डी शिवारात घडली.

याबाबत कंपनील मॅनेजर पवन भुतडा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते श्री महालक्ष्मी स्टील एलएलपी या कंपनीत कामाला आहेत. कंपनीतील गोडावून पाथर्डी शिवारात आहे. या गोडावूनमध्ये कंपनीतील कामगार शिवशंकर सोनू, रामसिंग, मोनू, रामू व छोटेलाल  हे राहतात.   19 मे 2024 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास कंपनीचा क्रेन ड्रायव्हर शामसुंदर यादव यास जाग आली. तेव्हा दोन इसम गोडावूनमधून एका गाडीत लोखंडी सळ्या टाकत असल्याचे त्याने पाहिले. घाबरून गेल्याने कोणाला काही न सांगता तो परत झोपून गेला. 

सकाळी मॅनेजर कामावर आले असता शामसुंदरने त्यांना सांगितले की, एमएच 15 एचएच  7676 या क्रमांकाच्या टाटा इन्ट्रा गाङीत कंपनीतील कर्मचारी शिवशंकर व सुरज हे सळ्यांचे बंडल टाकत असताना पाहिले. त्याने हे सांगितल्यानंतर भुतडा यांनी गोडावूनमधील मालाचे ऑडिट केले. तेव्हा त्यांना 25 टन माल कमी असल्याचे निदर्शनास आले. चौकशी केली असता सोहम सेल्स कॉर्पेारेशनमध्ये काम करणाऱ्या सुरज व राम बोडके यांनी शिवशंकरच्या मदतीने हा माल चोरल्याचे समजले. याप्रकरणी भुतडा यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनार करीत 
आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group